'त्या' १२ आमदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; निलंबनाच्या स्थगितीला नकार

भाजपला मोठा धक्का तर महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
'त्या' १२ आमदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; निलंबनाच्या स्थगितीला नकार
'त्या' १२ आमदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; निलंबनाच्या स्थगितीला नकार Saam tv

संतोष शाळीग्राम

नवी दिल्ली - भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तसंच याबाबत सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही. या प्रकरणी आता पुढची सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का तर महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

हे देखील पहा -

जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात गदारोळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात सुनावणीनंतर आता राज्य सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १२ आमदारांच्या निलंबन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आमदारांना दणका दिला आहे.

'त्या' १२ आमदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; निलंबनाच्या स्थगितीला नकार
क्रिकेटपटू रोहित शर्माला अलिबागची भुरळ; खरेदी केली 4 एकर जागा

विधानसभेने आमदारांचे केलेले निलंबन रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे. यामुळे आता मात्र भाजपला कोणताही दिलासा मिळालेला नाही. विधिमंडळाकडे दिलासा देण्याची मागणी करू शकता, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com