लढणाऱ्या नेत्यापासून आपण हरपलो, मेटे यांचं अकाली निधन वेदनादायी : सुप्रिया सुळे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे.
Supriya Sule
Supriya SuleSaam Tv

मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विनायक मेटेंच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. लढणाऱ्या नेत्यापासून आपण हरपलो आहे. त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

Supriya Sule
मराठा समाजासाठी मोलाची कामगिरी विनायक मेटेंनी केली : शरद पवार

मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते, आम्ही राष्ट्रवादीत एकत्र काम केले आहे. त्यामुळे हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे. कष्ट करणाऱ्या लढणाऱ्या नेत्यापासून आपण हरवलो आहे. त्यांच कार्य आपण विसरुन चालणार नाही. त्यांचे कार्य आपण पुढे सुरू ठेवले पाहिजे. आर आर पाटील आणि अजित पवार यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी कुटुंबाचे मोठे नूकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील पाहा

आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे. अखेर त्यांनी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com