Supriya Sule On MVA : राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध, सुप्रिया सुळे अॅक्शन मोडवर

Maharashtra Political News: रयतेच राज्य आणण्यासाठी जबाबदारी राष्ट्रवादीची आहे, असे यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Supriya Sule
Supriya Sulesaam tv

Supriya Sule Latest Speech : राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविकास आघाडी कटिबध्द आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा बनल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या पुण्यात आयोजित सत्कार समारंभात बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, रयतेच राज्य आणण्यासाठी जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. देशात कुठेही काही चुकीचं घडलं तर त्याचा विरोध पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस करते. आता आपल्यावर आणखी मोठी जबाबदारी आली आहे. याच पुण्याने आपल्याला ११ आमदार दिले. पुण्याच्या राष्ट्रवादीकडून राज्याला आणि देशाला खूप अपेक्षा आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

Supriya Sule
Beed News: यापुढे ऊस तोडणीला जाऊ नका... बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे मजूरांना आवाहन; कारण काय?

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, या पदामुळे माझ्यावर खूप दडपण आलं आहे. सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्त्याच्या मार्गाने चालतो. आपल्या अनेक नेत्यांना नोटिसा आल्या आहेत, परंतु आपण खचून जायचं नाही. राज्यात अनेक ठिकाणी दंगली होत आहेत. राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे असा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवला. (Latest Political News)

Supriya Sule
Maharashtra Politics: वारीतील प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपये द्यावेत; काँग्रेसची शिंदे सरकारकडे मोठी मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याच्या या नियुक्तीनंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांचा सत्कार समारंभ पुण्यात पार पडला. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. यावेळी कार्यक्रमस्थळी राष्ट्रवदीकडून मोठया प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठा हार आणला होता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com