Mumbai News : सुरेश पुजारी टोळीच्या सात जणांना १० वर्षांचा तुरुंगवास; जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

मुंबईतील एका व्यावसायिकाला फोन करुन ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाच्या प्रकरणात कुख्यात गुंड सुरेश पुजारी टोळीतील ७ जणांना मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
mumbai news
mumbai newssaam tv

सूरज सावंत

Mumbai Crime News : मुंबईतील (Mumbai) एका व्यावसायिकाला फोन करुन ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाच्या प्रकरणात कुख्यात गुंड सुरेश पुजारी टोळीतील ७ जणांना मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुरेश पुजारी टोळीतील १० वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे.

mumbai news
दुर्दैवी! लिफ्टमध्ये अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू, मालाड मधील शाळेतील प्रकार

नेमकं काय आहे प्रकरण ?

गँगस्टर सुरेश पुजारीने गँगस्टर रवी पुजारीच्या टोळीपासून वेगळे झाल्यावर त्याने मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज्य करता यावे म्हणून स्वत:ची टोळी तयार करण्याची तयारी केली. २०१५ मध्ये सुरेश पुजारी याने एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून एका व्यावसायिकाला फोन केला होता आणि त्याने 5 कोटी रुपये हवे असल्याचे सांगितले.

'सुरेश पुजारीला ओळखत नसल्यास केबल ऑपरेटरच्या हत्येचा व्हिडिओ यूट्यूबर बघ. उल्हासनगरमध्ये त्याची मुलाखत पाहा आणि सुरेश पुजारी कोण आहे हे देखील समजेल', असे धमकावले. सुरेश पुजारी याने नंतर व्यावसायिकाला मेसेजही पाठवला होता, ज्यामध्ये त्याने पैसे न दिल्यास पुजारीच्या टोळीतील सदस्य त्याला आणि त्याच्या कुटुंबाला गोळ्या घालतील, असे लिहिले होते.

mumbai news
Breaking : सहा वर्षांच्या मुलीसह आईनं संपवलं जीवन, माय-लेकीच्या आत्महत्येमुळं खळबळ

याप्रकरणी तत्कालीन गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने 1) प्रकाश रामसिंग बीचल उर्फ ​​पक्या, 2) मुबशीर मुजीब सय्यद उर्फ ​​वकील, 3) गौतम विनोद मेहता उर्फ डॉन, 4) छोटेलाल लुतीराम जैस्वार उर्फ ​​राजू, 5) कृष्णा लक्ष्मण खंडागळे, ६) नरेश जयराम शेट्टी, ७) रवी काळूराम गायकवाड यांना अटक केली. सदर प्रकरणाचा तपास एपीआय नंदकुमार मोरे आणि एपीआय राजू सर्वे यांनी केला. विशेष मकोका न्यायालयाने या आरोपींना १० वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपयांची शिक्षा सुनावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com