
मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andheri) अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करताना दिसतात. मात्र, त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाची तोफ असणार्या सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. टेंभी नाका येथील आनंद मठात हा प्रवेश होणार आहे. यावर सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे.
वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं की 'आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी शिंदे गटात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. त्यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हो म्हटलं आणि आज प्रवेश करत आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली आहे.
पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडेल. तसेच येत्या काही दिवसात सुषमा अंधारे काय होत्या. याच्या बाबतीत जळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितल आहे असंही ते यावेली बोलताना म्हणाले. त्यामुळे अंधारे बॅकफूटवर जातात की अधिक आक्रमक होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.