Pune News: प्रेमाचा भयंकर शेवट; मुलीच्या संशयास्पद मृ्त्यूनंतर काही तासांतच प्रियकरानं मृत्युला कवटाळलं

पिंपरी चिंचवडच्या खरांळवाडी अल्पवयीन मुलीचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला होता.
Satara, phaltan
Satara, phaltanSaam Tv

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात अल्पवयीन मुलाचा मृत्यू आणि त्यानंतर तिच्या प्रियकराच्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडच्या खरांळवाडी अल्पवयीन मुलीचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांत या दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Pune News)

पिंपरी चिंचवडमधील या मुलीचा पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये एका इमारतीवरून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्याआधीच मुलीच्या प्रियकराने देखील आज संध्याकाळी आत्महत्या केली आहे. खरांळवाडी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जयेश या तरुणाने आत्महत्या केली आहे. (Latest News)

Satara, phaltan
Marriage News: नवरदेव लग्नाला जायलाच विसरला; दुसऱ्या दिवशी सासरवाडीला पोहोचला, तिथं जे झालं...

जयेश आणि संशयित मृत्यू झालेल्या मुलीचे प्रेम संबंध होते. आत्महत्या करण्यापूर्वी जयेशने मिस यू डार्लिंग, का सोडून गेलीस तू असा आशयाच्या पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्या होत्या.

Satara, phaltan
Maharashtra Government : सरकार पडण्याच्या भीतीनंच मंत्रालयात लगबग; महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

जयेश याच्यावर सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. या आत्महत्या प्रकरणाची पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com