स्वच्छ भारत सर्वेक्षण: लोणावळा नगरपरिषद देशातून दुसरी! नागरिकांचा जल्लोष...
स्वच्छ भारत सर्वेक्षण: लोणावळा नगरपरिषद देशातून दुसरी! नागरिकांचा जल्लोष...दिलीप कांबळे

स्वच्छ भारत सर्वेक्षण: लोणावळा नगरपरिषद देशातून दुसरी! नागरिकांचा जल्लोष...

हा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्विकारल्यानंतर आज या पुरस्काराची लोणावळा शहरात जल्लोष यात्रा काढण्यात आली होती.

मावळ: पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या मावळमधील लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ भारत सर्वेक्षणात (Swachh Survekshan) संपुर्ण भारतातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. याचा जल्लोष (Celebration) आज लोणावळा (Lonavla) नगरीत करण्यात आला. लोणावळ्यात भारतातून अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे येणारे पर्यटक अनेकदा अस्वच्छता करत असतात. परंतु लोणावळा नगरपरिषद अग्रेसर राहून लोणावळा स्वच्छ आणि सुंदर ठेवत या सर्वेक्षणात भारतात दुसरा क्रमांक पटकावला. (Swachh Bharat Survey: Lonavla Municipal Council is second in the country! Citizens' celebration ab95)

हे देखील पहा -

मात्र पुढील वर्षी नक्कीच पहिला क्रमांक मिळवू असा विश्वास नगराधक्ष्या सुरेखा जाधव यांनी व्यक्त केलाय. त्यामुळेच याचा आनंद आज लोणावळ्यात साजरा करण्यात आला. दरम्यान पारंपारिक नऊवारी साड्या परिधान करून मोठ्या प्रमाणात महिलांनी हजेरी लावली होती. तर नागरिकांनीही महाराष्ट्रीयन पद्धतीचा मराठमोळा पोशाख परिधान करून आणि फेटेही घातले होते. महिलांनी फुगडी आणि नृत्यही केले, त्यामुळे पर्यटन नगरी आनंदात न्हाऊन निघाल्याचं चित्र लोणावळ्यात पहायला मिळालं. अभिनेत्री मेधा धाडे देखील या जल्लोष रॅलीला आवर्जून उपस्थित होत्या. लोणावळा शहराने देशातील दुसर्‍या क्रमांकाचे स्वच्छ शहर हा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते स्विकारल्यानंतर आज या पुरस्काराची लोणावळा शहरात जल्लोष यात्रा काढण्यात आली होती.

स्वच्छ भारत सर्वेक्षण: लोणावळा नगरपरिषद देशातून दुसरी! नागरिकांचा जल्लोष...
जन्मजात बाळाला दोन डोके; पालकांनीच काढला रुग्णालयातून पळ !

मावळा पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान झालेल्या या जल्लोष यात्रेत लोणावळा नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी, शहरातील नागरिक, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. घोडे, उंट, रथ, लेझिम व फुगड्यांचा खेळ, फटाक्यांची आतीषबाजी अशा जल्लोषपूर्ण वातावरणात ही यात्रा संपन्न झाली.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com