'स्वाईन फ्लू'ने वाढवलं मुंबईकरांचं टेन्शन! आठवड्याभरातच रुग्णसंख्येत सुमारे पाचपटीनं वाढ

मागील आठवडाभरातच याचा प्रसार वाढला असून २४ जुलैपर्यंत रुग्णसंख्या ६२ वर पोहोचली आहे.
Swine Flu News
Swine Flu NewsSaam TV

मुंबई: मुंबईत (Mumbai) सध्या ‘H1 N1’ म्हणजेच 'स्वाईन फ्लू'चा धोका वाढत असून 8 दिवसांतच रुग्णसंख्या सुमारे पाच पटीने वाढून ६२ वर पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी अद्याप एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

'स्वाईन फ्लू'चा (Swine flu) प्रसार वाढू लागला असून १७ जुलैपर्यत शहरात डेंग्यूचे देखील ११ रुग्ण आढळले होते. मागील आठवडाभरातच याचा प्रसार वाढला असून २४ जुलैपर्यंत रुग्णसंख्या ६२ वर पोहोचली आहे. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत यामुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत जानेवारी ते २४ जुलैपर्यंत फ्लूचे ६६ रुग्ण आढळले आहेत.

पाहा व्हिडीओ -

कोरोना (Corona) महामारिच्या काळात २०२० आणि २०२१ मध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव तुलनेने फार कमी होता. मुंबईत फ्लूचे २०२० मध्ये ४४, तर २०२१ मध्ये ६४ रुग्ण आढळले होते. यावर्षी जुलैमध्येच फ्लूच्या रुग्णांची संख्या ६६ वर गेली आहे. येत्या काळात ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. स्वाईन फ्लूचा यावर्षी प्रसार निश्चितच वाढत आहे. यादृष्टीने आवश्यक उपाययोजना पालिकेने केलेल्या असून रुग्णांसाठी कस्तुरबामध्ये दाखल करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

लक्षणे काय?

Swine Flu News
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी लिलावती रुग्णालयात दाखल; मुख्यमंत्रीही पोहोचले भेटीला

ताप, खोकला, घसादुखी, डोकेदुखी, अंगदुखी, उलटय़ा, जुलाब ही स्वाईन फ्लूची सर्वसाधारण लक्षणे आहेत. गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांमध्ये लक्षणे तीव्र होऊन आजार गंभीर स्वरुप धारण करू शकतो. रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलटीतून रक्त पडणे अशी गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.

काळजी काय घ्यावी?

खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ करावे, डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, लक्षणे आढळल्यास स्वत:हून औषधे न घेता वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत असा सल्ला नागरिकांना प्रशासनाकडू करण्यात येत आहे. त्यामुळे नुकतचं कोरोनातून बाहेर पडलेल्या मुंबईकरांनसमोर आता 'स्वाईन फ्लू'चे संकट उभं राहिल्याचं बोललं जात आहे.

एकूण १४२ स्वाइन फ्लू चे संपूर्ण राज्यात रुग्ण

मुंबई - ४३

पुणे - २३

पालघर - २२

नाशिक - १७

नागपुर - १४

कोल्हापुर - १४

ठाणे - ७

कल्याण डोंबिवली - २

आतापर्यंत सात जणांचा मृत्यू

पुणे - २

कोल्हापुर - २

ठाणे - २

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com