ठाकरे सरकार विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर ठाम, सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष तीव्र होणार

महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकार विरुद्ध राज्यपाल
सरकार विरुद्ध राज्यपालSaam Tv

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, सरकार उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर ठाम आहेत. उद्या निवडणूक घेणार असा पवित्रा छाकरे सरकारने घेतलाय. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल असं चित्र पाहायला मिळणार आहे. (Tackeray Govt Vs Governor Government Decide To Take Assembly Speaker Elections Tomorrow)

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक विधान भवनातील समिती कक्षात पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई तसेच इतर मंत्री, मुख्य सचिव आणि सचिवही उपस्थिती होते. या बैठकीत उद्याची निवडणूक घेणारच अशी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे आता उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) होणार का आणि झाली तर कोण निवडूण येणार हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा -

सरकार विरुद्ध राज्यपाल
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आवाजी पद्धतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी असा नियमबदलाचा प्रस्ताव सरकारने राज्यपालांना पाठवला होता. त्यावर राज्यपालांनी निर्णय दिलेला नाही. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलं आहे की विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य आहे. त्यानंतर सरकारनेही राज्यपालांना पत्र लिहून कळवले की लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय द्यावा. मात्र, अद्याप राज्यपालांकडून कुठलाही निर्णय आलेला नाही. त्यामुळे सरकार निवडणूक घेण्याचा पवित्र्यात आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा बैठकीची रणनीती कशाप्रकारे आखायची, अध्यक्ष कशा पद्धतीने निवडूण आणायचा. याबाबतची योजना आता ठाकरे सरकार ठरवणार आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com