
रश्मी पुराणिक -
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेली भूमिका तसंच महाराष्ट्र दिनी औरंगाबादमधील सभेत अल्टिमेटमबाबत पुन्हा केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आला असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था शांत राहावी यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश गृहंत्र्यांनी दिले आहेत.
तसंच पोलिस यंत्रणेने (Police system) कठोर पावले उचलावी, कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना ताब्यात घ्या. खबरदारी म्हणून त्यांना नोटीस द्या. तसंच जे सामाजिक तेढ निर्माण करणारे असतील त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश देखील गृहमंत्र्यांनी दिले आहेत. शिवाय राज्यातील संवेदनशील भागात प्रशासनाला अलर्ट रहायला सांगितलं आहे.
हे देखील पाहा -
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला भोंग्यांबाबत अल्टिमेटम दिल्यामुळे राज्यातील कायदा आमि सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे गृहखात्याने सावध भूमिका घेतली असून आज गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती यावेळी हे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील शांतता बिघडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी काहीजणांना सुपाऱ्या देण्यात आल्या आहेत. मात्र, सुपाऱ्या घेतलेल्या लोकांध्ये तेवढी ताकद नाही. त्यामुळे कोणी कितीही मनात आणले तरी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला धोका नसल्याचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.