Shivsena Political Crisis: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव घेऊन सेनानेते सूरतला रवाना

नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक प्रस्ताव पाठवला आहे.
Shivsena Political Crisis: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव घेऊन सेनानेते सूरतला रवाना
Eknath Shinde ShivsenaSaam TV

मुंबई : नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव घेऊन सेनानेते मातोश्रीहून निघाल्याची माहीती समोर येत आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मागील काही दिवसांपासून नाराज होते.

दरम्यान, शिंदे हे काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. ते गुजरातमधील (Gujrat) एका हॉटेलमध्ये थांबले असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार देखील उपस्थित आहेत. शिंदे जर शिवसेनेमधून (Shivsena) बाहेर पडले तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात येऊ शकतं.

हे देखील पाहा -

त्यामुळे हा धोका ओळखून तसंच शिंदे यांची आमदारांवरती असणारी पकड ही शिवसेनेचे नेते जाणून आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करणं गरजेच असल्या कारणानेच आता मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मिलिंद नार्वेकर आणि रवी पाठक (Milind Narvekar and Ravi Pathak) हे दोन सेनानेते सुरतकडे रवाना झाले आहेत. मिलिंद नार्वेकर गुजरात जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू शकतात. नार्वेकर हे मुख्यमंत्री यांचे विश्वासू सहकारी आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पक्षासमोर एक मोठा प्रस्ताव ठेवला असून भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन करा आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करा अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युती होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना काय प्रस्ताव पाठवला आहे आणि मुख्यमंत्र्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे स्विकारणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com