टाटा ग्रुपचे चेअरमन राहत होते भाड्याने, त्याच इमारतीत विकत घेतला ९८ कोटींचा फ्लॅट

याच इमारतीत ते पूर्वी भाड्याने राहत होते. आता त्यांनी याच इमारतीमध्ये तब्बल ९८ कोटी रुपयांचा फ्लॅट विकत घेतला आहे.
टाटा ग्रुपचे चेअरमन राहत होते भाड्याने, त्याच इमारतीत विकत घेतला ९८ कोटींचा फ्लॅट
N. ChandrasekharanSaam Tv

मुंबई : टाटा ग्रुपचे (Tata Group) चेअरमन एन. चंद्रशेखरन (N. Chandrasekharan) त्यांच्या कुटुंबासोबत गेल्या पाच वर्षापासून मुंबईत भाड्याने राहत होते. मुंबईतील पेडर रोड परिसरात त्यांनी आता एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. सध्या या व्यवहाराची चर्चा चांगलीच सुरु आहे. एका लक्झरी टॉवरमध्ये त्यांनी एक फ्लॅट विकत घेतला आहे. मुंबईतील जसलोक रुग्णालयाजवळ २८ मजली इमारत आहे. याच इमारतीत ते पूर्वी भाड्याने राहत होते. आता त्यांनी याच इमारतीमध्ये तब्बल ९८ कोटी रुपयांचा फ्लॅट विकत घेतला आहे.

पॉश लोकेशनमध्ये २८ मजली इमारत आहे. चंद्रशेखरन आणि त्यांचे कुटुंब या इमारतीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून भाडे तत्त्वावर राहत होते. त्यांचे नवीन निवासस्थान इमारतीच्या ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर आहे. हा फ्लॅट सुमारे ६ हजार स्क्वेअर फुट आहे.

हे देखील पाहा

N. Chandrasekharan
Tata Steel Factory Fire: टाटा स्टीलच्या प्रकल्पात मोठ्या स्फोटानंतर भीषण आग

एन. चंद्रशेखरन यांनी टाटा ग्रुपच्या (Tata Group) चेअरमन पदाची सुत्रे २०१७ ला हाती घेतली. यानंतर एन. चंद्रशेखरन या इमारती मध्ये राहण्यासाठी आले. यावेळी या फ्लॅटचे प्रति महिना भाडे २० लाख रुपये एवढे होते.

अहवालानुसार, हा व्यवहार १.६ लाख रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. चंद्रशेखरन त्यांची पत्नी ललिता आणि मुलगा प्रणव यांच्या नावावर तीन दिवसांपूर्वी या फ्लॅटची नोंदणी करण्यात आली आहे. ही इमारत भोजवानी आणि विनोद मित्तल यांनी २००८ मध्ये बांधली होती. टाटा सन्सने (Tata Group) त्यांना आणखी पाच वर्षांसाठी टाटा ग्रुपचे (Tata Group) चेअरमन म्हणून नियुक्त केले आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत वाढवला आहे. एन. चंद्रशेखरन हे रतन टाटा यांचे विश्वासू मानले जातात.

Edited By - Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.