गुजरात दंगल प्रकरण : सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATSने घेतले ताब्यात

सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड (teesta setalvad) यांना गुजरात एटीएस पथकाने ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर गुजरात (Gujrat) एटीएस पथकाने अहमदाबाद येथे घेऊन रवाना झाले आहेत.
teesta setalvad
teesta setalvadsaam tv

मुंबई : गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतरांना विशेष तपास पथकाने दिलेल्या क्लिनचीटला आव्हान देणारी जाकिया जाफरी यांची याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड यांच्या 'एनजीओ'ची चौकशीचे गरज व्यक्त केली. तसेच शनिवारी सकाळी अमित शाह (Amit Shah) यांनी 'एएनआय'च्या मुलाखतीत सेटलवाड यांच्यावर एक आरोप केला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड (teesta setalvad) यांना गुजरात एटीएस पथकाने ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर गुजरात (Gujrat) एटीएस पथकाने अहमदाबाद येथे घेऊन रवाना झाले आहेत. ( teesta setalvad Latest news In Marathi )

teesta setalvad
गुजरात दंगल मोदींनी घडवली हा आरोप खोटा; अमित शाहांनी सोडलं मौन

गुजरात दंगलीत गोध्रा ट्रेनच्या एका डब्ब्याला आग लागल्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासहित ६८ लोक मारले गेले होते. या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या एसआयटीने नरेंद्र मोदी यांच्यासहित इतरांना क्लिनचीट दिली होती. त्यामुळे काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरीने सर्वोच्च न्यायालयात त्या क्लिनचीट विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका शुक्रवारी फेटाळली.

त्यानंतर शनिवारी सकाळी अमित शाह यांनी एएनआयच्या मुलाखतीत सेटलवाड यांनी एनजीओच्या मदतीने गुजरात दंगलीची तथ्यहीन माहिती दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गुजरात एटीएस पथकाने तीस्ता सेटलवाड यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. पुढे मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर गुजरात एटीएस पथकाने अहमदाबाद येथे घेऊन रवाना झाले आहेत.

teesta setalvad
2002 Gujarat riots: अंतरात्मा असेल तर आरोप करणाऱ्यांनी मोदींची माफी मागावी: अमित शाह

काय म्हणाले होते अमित शाह ?

सुप्रीम कोर्टाने अलीकडेच दिलेला निर्णय, दंगलीशी संबंधित घटनांमध्ये माध्यमे, एनजीओ, राजकीय पक्षांची भूमिका याबाबत त्यांनी भाष्य केलं. मोदीजींनी चौकशीला सर्व सहकार्य केले. कुणीही धरणे धरले नाहीत. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले नाहीत. संविधानाचा कशाप्रकारे सन्मान केला जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण नरेंद्र मोदींनी समोर ठेवले आहे. आरोप करणाऱ्यांनी माफी मागायला हवी, असं अमित शाह यांनी सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीबाबत एएनआयशी बोलताना सांगितलं की, 'अधिकारी आणि पोलीस प्रशासनानं दंगल नियंत्रित करण्यात चांगले काम केले. मात्र, घटनेमुळे गोध्रा ट्रेन जळीतकांड प्रकरणामुळे लोक संतप्त होते. त्याची कुणकुण कुणालाच लागली नाही. ना पोलिसांना, ना कुणाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहू शकली नव्हती.'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com