SSC Result 2022: दहावीचा उद्या निकाल; कुठे आणि कसा पाहाल? वाचा सविस्तर

निकालाची तारीख जाहीर झाली असली तरी देखील अनेक वेळा सदरचे निकाल पहायचे कसे? याबाबत अनेक अडचणी येतात.
SSC Result 2022: दहावीचा उद्या निकाल; कुठे आणि कसा पाहाल? वाचा सविस्तर
SSC Result 2022Saam TV

मुंबई : इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षांचे निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा होती. त्यांची ती प्रतीक्षा आता संपुष्टात आली असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) उद्या दिनांक १७ जून, २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन (Online) जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज दिली आहे.

निकालाची तारीख जाहीर झाली असली तरी देखील अनेक वेळा सदरचे निकाल पहायचे कसे ?याबाबत अनेक अडचणी येतात. उद्या लागणारे निकाल हे अनेक दिवसांनी प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपला निकाल पाहण वेगळाचं सोहळा असतो. त्यांची धाकधुक देखील वाढलेली असते, मात्र नेमकं अशा वेळी एकत्र सर्व विद्यार्थ्यांनी निकाल सर्च केल्यामुळे बेवसाईट (Website) लोड घेतात.

हे देखील पाहा -

त्या लवकर अपडेट्स देत नाहीत. त्यामुळे उद्याचे निकाल विनाअडथळा पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत बेवसाईट दिल्या आहेत त्याद्वारे आपण निकाल पाहू शकतो त्या वेबसाईट खालीलप्रमाणे आहेत.

SSC Result 2022: असा तपासा निकाल

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.

वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा .

पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.

प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासू शकता.

त्यानंतर तुम्हाला विषयानुसार प्राप्त झालेल मार्क वरील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com