एकीकडे गणेशाचे आगमन; तर दुसरीकडे कोकणी पाड्याजवळ भीषण अपघात !
एकीकडे गणेशाचे आगमन; तर दुसरीकडे कोकणी पाड्याजवळ भीषण अपघात !रुपेश पाटील

एकीकडे गणेशाचे आगमन; तर दुसरीकडे कोकणी पाड्याजवळ भीषण अपघात !

विक्रमगड तालुक्यातील आलोंडे कोकणी पाडा येथील राईसमील जवळच डहाणू- ठाणे आणि वाडा- जव्हार बसचा सकाळच्या सुमारास समोरासमोर मोठी ठोकर लागून भीषण अपघात झाला आहे

पालघर : विक्रमगड तालुक्यातील आलोंडे कोकणी पाडा येथील राईसमील जवळच डहाणू- ठाणे आणि वाडा- जव्हार बसचा सकाळच्या सुमारास समोरासमोर मोठी ठोकर लागून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी. दोन्ही बस मधील 50 प्रवासी किरकोळ तसेच गभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

विक्रमगड वरून वाडाकडे जाणारी डहाणू- ठाणे तसेच वाडा वरून येणारी जव्हार- वाडा बस कोकणीपाडा या ठिकाणी राईसमिल जवळ समोरासमोर ठोकर होऊन भीषण अपघात झाला आहे.

एकीकडे गणेशाचे आगमन; तर दुसरीकडे कोकणी पाड्याजवळ भीषण अपघात !
एकीकडे गणेशाचे आगमन; तर दुसरीकडे कोकणी पाड्याजवळ भीषण अपघात !Saam Tv

या अपघातात दोन्ही बसमधील जवळ- जवळ 50 प्रवासी जखमी झाल्याचे या बसमधील प्रवाशानी सांगितले आहे. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना तातडीने वाडा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com