TET परीक्षा फेरफार प्रकरण: पुणे पोलिसांची उत्तरप्रदेशात मोठी कारवाई !

जी ए सॉफ्टवेअर कंपनीच्या सौरभ त्रिपाठीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
TET परीक्षा फेरफार प्रकरण: पुणे पोलिसांची उत्तरप्रदेशात मोठी कारवाई !
TET परीक्षा फेरफार प्रकरण: पुणे पोलिसांची उत्तरप्रदेशात मोठी कारवाई ! अमोल कविटकर

अमोल कविटकर

पुणे : टीईटी परीक्षा घोटाळा (TET exam scam) प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Police) लखनऊ (Lucknow) मधून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव सौरभ त्रिपाठी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ त्रिपाठी हा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा लायझिंग अधिकारी आहे. टीईटी परीक्षा २०१८ मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेतले आहे.

TET परीक्षा फेरफार प्रकरण: पुणे पोलिसांची उत्तरप्रदेशात मोठी कारवाई !
Sanjay Raut | 2024 नंतर उलटी गंगा वाहू लागेल, संजय राऊतांची भाजप सरकारवर टीका

लखनऊ उत्तरप्रदेशातून घेतले ताब्यात;

२०१८ सालच्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) निकालात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी याला अटक केली आहे. सौरभ त्रिपाठी हा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा लायझिंग अधिकारी आहे. सौरभ त्रिपाठी सध्या 'विनर' कंपनीमध्ये कार्यरत आहे. सध्या शिक्षण विभागाच्या परीक्षांचे कामकाज विनर कंपनीकडे आहे. त्याने २०१८ सालच्या टीईटी परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार केल्याचा ठपका आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनऊ येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

सौरभ वर आरोप आहे की, अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम तो करत होता. यापूर्वी टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी. ए. सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली होती.

हे देखील पहा-

उत्तरप्रदेशातही परीक्षा घोटाळा?

सौरभ त्रिपाठी सध्या 'विनर' कंपनीमध्ये कार्यरत असून सध्या शिक्षण विभागाच्या परीक्षांचे कामकाज सध्या विनर कंपनीकडे आहे, त्यामुळे विनरच्या उत्तरप्रदेशातील परीक्षाही वादग्रस्त ठरणार का? असा प्रश्न उपस्थित आहे.

टीईटी घोटाळा प्रकरणात अटक;

टीईटी घोटाळा प्रकरणा आतापर्यंत पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक केली आहे. त्यानंतर परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरे यांनाही अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत तुकाराम सुपे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com