TET Exam Scam: सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना आज कोर्टात हजर करणार

या घोटाळ्यात आणखी कोणते बडे मासे हाती लागतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Sushil Khodwekar
Sushil KhodwekarSaam Tv

पुणे - टीईटी परीक्षा गैरव्यवहार (TET Exam Scam) प्रकरणी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर (Sushil Khodwekar) यांना पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber Police) ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. कोर्टाने खोडवेकर यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. खोडवेकर यांची आज पोलीस कोठडी (Police Custody) संपणार आहे त्यामुळे त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी पुणे पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुशील खोडवेकर यांना आज दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे.

हे देखील पहा -

दरम्यान सुशील खोडवेकर हे या पूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते. खोडवेकर यांनी शिक्षक भरती परीक्षेत घोटाळा केल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे. याची माहिती पोलीस काढणार आहेत. या घोटाळ्यात आणखी कोणते बडे मासे हाती लागतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com