शिवतीर्थ यंदा ठाकरेंविना?
शिवतीर्थ यंदा ठाकरेंविना?Saam Tv

शिवतीर्थ यंदा ठाकरेंविना?

यंदा शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरेंच्या ९ व्या स्मृतिदिनी बाळासाहेबांच्या कुटुंबातील कोणीही शिवतीर्थावर उपस्थिती लावणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ९ वा स्मृतिदिन आहे. पण यंदाच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील म्हणजेच ठाकरे कुटुंबातील कोणीही शिवतीर्थावर आज उपस्थिती लावणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे यंदा शिवतीर्थ ठाकरेंविनाच राहणार अशी चर्चा आहे. (thackeray family will not come on shivteerth this year)

हे देखील पहा -

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेवरच्या सर्जरीच्या निमित्तानं रिलायन्स रुग्णालयांमध्ये सध्या उपचार घेत आहेत, तर आदित्य ठाकरे हे परदेशात असल्याने तेही बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर येणार नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील एकही सदस्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्मृतीस्थळावर उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. असं असलं तरी राज ठाकरे हे या स्मृतीस्थळी जाणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. नुकतंच त्यांनी नवं घर घेतलं आहे, ज्याचं नावही शिवतीर्थ ठेवण्यात आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com