ठाकरे गट आक्रमक; हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरणार, कशी असेल रणनीती?

शिंदे गट आणि भाजप सरकारला घेरण्यासाठी काय रणनिती असावी, यासाठी विरोधकांनी तयारी सुरु केली आहे.
shivsena uddhav thackeray
shivsena uddhav thackeray saam tv

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर दुसरं अधिवेशन येत्या काही दिवसात पार पडणार आहे. या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. शिंदे गट आणि भाजप सरकारला घेरण्यासाठी काय रणनिती असावी, यासाठी विरोधकांनी तयारी सुरु केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांची विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात बैठक पार पडणार आहे. आगामी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी ठाकरे गटाने रणनिती आखली आहे. (Tajya Batmya)

shivsena uddhav thackeray
Sanjay Raut : येत्या दोन महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? संजय राऊतांचं मोठं विधान

काही वेळापूर्वी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि गटनेते अजय चौधरी यांच्याशी चर्चा केली. यानंतर विधानभवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज 4 वाजता ही बैठक पार पडणार आहे.

shivsena uddhav thackeray
Political News: खडसेंच्या मुलाचे काय झाले, तपासण्याची गरज; गिरीश महाजनांचे खळबळजनक वक्‍तव्‍य

हिवाळी अधिवेशनला अजून वेळ आहे. त्यामुळे त्यात काय काय असावे ते आताच सांगता येणार नाही. पण अधिवेशन हे मोठे असावे अशी आमची मागणी आहे. तसेच शेतकऱ्यांचे विषय, लम्पी आजार अशा अनेक विषयांवर सरकारला आम्ही अधिवेशनमध्ये जाब विचारू, असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com