Sanjay Raut On Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर असली तरी संजय राऊतांना वाटते ही भीती

Karnataka Assembly Election Result: कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर असून भाजप (BJP) पिछाडीवर आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

Mumbai News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) मतमोजणी सुरु आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर असून भाजप (BJP) पिछाडीवर आहे. यावरुन आता महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते भाजवर जोरदार टीका करु लागले आहेत.

'कर्नाटकमध्ये काँग्रेस आघाडीवर नाही तर काँग्रेसच सत्ता स्थापन करेल.', असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. तसंच, 'जरी पराभव झाला असला तरी तोडफोड करून काही बनवता येईल का याचा प्रयत्न सुरू आहे.', अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Sanjay Raut
Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये JDS पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत? कॉंग्रेस,भाजपकडून संपर्क सुरू

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवरुन जे चित्र समोर आले त्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर नाही तर काँग्रेस सत्ता स्थापन करेल. काँग्रेसचा विजय हा कर्नाटकच्या भाजपाच्या पराभवाचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा पराभव स्वीकारला पाहिजे. कारण या प्रमुख नेत्यांनी कर्नाटकमध्ये अक्षरशा तंबू ठोकला होता.'

तसंच, 'मी पाहिलं महाराष्ट्रातील काही लोकं प्रचाराला गेले तिथे भाजपचा पराभव झाला आहे. राज्यातून मोठी टोळी काँग्रेसच्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी तयार केली होती. पण ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. मी आधीही म्हणालो होतो हा कर्नाटकातचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षाच्या सत्तेचा दरवाजा उघडणार आहे.', असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले.

Sanjay Raut
Karnataka VidhanSabha Election Result 2023 : कर्नाटकात राष्ट्रवादी काॅंग्रेसची एंट्री ? 9 पैकी इतक्या मतदारसंघात आघाडी

संजय राऊतांनी पुढे सांगितले की, 2024 सालीसुद्धा याच पद्धतीचा निकाल लागणार आहे. देशाच्या मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली. पंतप्रधानांना कोणी ऐकलं नाही. गृहमंत्र्यांच्या दबावाला जुमानले नाही. राज्याराज्यातून भाजपच्या टोळ्या आल्या. त्यांच्या दबावाखाली कर्नाटकातील जनता बळी पडली नाही.' तसंच, 'आता मी ऐकतो आहे जरी पराभव झाला असला तरी तोडफोड करून काही बनवता येईल का याचा प्रयत्न सुरू आहे. कोणती स्टोरी चालली नाही फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंगबलीची गदा त्यांच्याच डोक्यावर पडणार.', असे संजय राऊतांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com