Sanjay Raut On Devendra Fadnavis: 'पोपट मेलेला आहे फक्त...', संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

Latest News: 16 आमदारांच्या अपात्रतेवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) निशाणा साधला होता.
Sanjay Raut On Devendra Fadnavis
Sanjay Raut On Devendra FadnavisSaam Tv News

Mumbai News: 'महाविकास आघाडीचा पोपट मेला' अशी टीका करणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना 'शिंदे सरकारचा पोपट मेलाय' असे वक्तव्य करत टोला लगावला आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) निशाणा साधला होता. 'उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं समजलं आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे.', अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला संजय राऊतांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: त्र्यंबकेश्वरमध्येही अलर्ट! जमावाकडून जबरदस्ती मंदिरात घुसण्याच्या प्रयत्नांनतर गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्यावर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 'सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलेलं आहे. पोपट मेलेलाच आहे. ते फक्त विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचे आहे. शिंदे सरकारचा पोपट मेलेला आहे.', असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

तसचं, 'मला असे वाटले होते की या अख्ख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. बाकी सगळे अतिशहाणे आणि मूर्ख आहेत. देवेंद्र फडणवीस जर असे बोलत असतील तर त्यांनी शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. त्यांना कायदा, प्रशासन कळतो. राजकारण, पडद्यामागे काय चालले हे कळते. ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत तरी देखील ते अशी वक्तव्य करत आहेत म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी आहे असे दिसत आहे.', अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
Kalicharan Maharaj News: आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकणी कालीचरण महाराजांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'या सरकारच्या घटनात्मक वैधतेचा निर्णय होणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची पूर्तता होईपर्यंत हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर हे ठरणे गरजेचे आहे. आमच्या दृष्टिकोनातून हे सरकार बेकायदेशीर आहे. या वक्तव्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.' तसंच, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये सरकारची ही भूमिका आहे. नाशिकमध्ये माझ्या पत्रकार परिषदेला जे पत्रकार उपस्थित होते त्यांच्यावर दबाव आणला जातोय. त्यांना हवी तशी स्टेटमेंट द्या असा दबाव पोलीस करत आहेत.', असं देखील राऊतांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com