Aaditya Thackeray On Budget : ' केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय'; अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरेंची टीका

अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Aaditya Thackeray, Narendra Modi
Aaditya Thackeray, Narendra Modisaam tv

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकरी आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून हे शेवटचे अर्थसंकल्प असेल. या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम केलं, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. (Latest Marathi News)

Aaditya Thackeray, Narendra Modi
Union Budget 2023 : नर्सिंग कॉलेज संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महत्त्वाची घोषणा

अर्थसंकल्पावर भाष्य करताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, ' महाराष्ट्राला काय मिळणार हे उत्सुकतेने बघत होतो. आपल्याला नक्की काय मिळालं. ज्या राज्यात निवडणुका झाल्या जिथे सगळे प्रोजेक्ट्स गेले, त्यांना सुरतला डायमंड हब मिळालं. सगळे प्रोजेक्ट्स तिथे नेले. तरी त्यांना अधिकच्या सवलती मिळाल्या. महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम केलं. कर्नाटकात जिथे निवडीला आहेत तिथे खर्च दाखवला आहे'.

'अर्थसंकल्पात मुंबई, महाराष्ट्राचा उल्लेख नाही. महाराष्ट्राला मुंबईसमोर झुकवायचंय आणि काहीच द्यायचं नाही. महिला,तरुणांना देखील काही दिलं नाही. कर्नाटकसाठी देखील कित्येक गोष्टी दिल्या आहेत', असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

Aaditya Thackeray, Narendra Modi
Merchant Upset | Union Budget 2023 | बजेटवर महाराष्ट्रातील व्यापारी नाराज

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'बजेट म्हणजे देशाची दिशा दाखवणारे बाब असते. भविष्यात आपण काय करणार आहोत याबाबत सांगितल जातं. एकिकडे भारत मंदी जवळ असताना कशाप्रकारे भारत लढेल ही निर्मल आशा धुळीस मिळाली आहे. बजेटचे केवळ आकडे फुगवले जातायत, असे आव्हाड म्हणाले.

'हिडेनबर्ग आणि अदानी विषयावर वृत्तपत्र बोलताना दिसत नाही. टिव्ही वर देखील ते समजत नाहीं. वृत्तपत्रात देखील छापत नाहीत, अशी टीका आव्हाड यांनी अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com