Thane Election News: ठाणे निवडणुकीसाठी ठाकरे गट अलर्ट; फुटणाऱ्या नगरसेवकांसाठी खास Video शेअर करत दिला इशारा

Maharashtra Political News Updates: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक शिंदे गटात जाण्याची भीती ठाकरे गटाला सतावत आहे.
Uddhav Thackeray On CM EknathShinde
Uddhav Thackeray On CM EknathShindeSaam TV

निवृत्ती बाबर

Thane Municipal Election: आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सत्ता आणण्यासाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याने ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. ठाकरे गटाकडून ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यामधून बंडखोरी करणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. (ThaneNews)

Uddhav Thackeray On CM EknathShinde
WPL Auction 2023 Updates: टीम इंडियातील "जय-विरू"वर कोट्यवधींची बोली, पण कोणत्या संघासोबत दिसणार?

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट तयारीला लागला आहे. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक शिंदे गटात जाण्याची ठाकरे गटाला भीती सतावत आहे.

त्यामुळे ठाकरे गटाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिवेसेनेचा इतिहास, ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची वाटचाल याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray On CM EknathShinde
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी BJPचा मेगाप्लान; काय आहे मिशन १५०?

महत्वाचे म्हणजे यामध्ये नगरसेवक फुटल्यास बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस काय म्हटलं होतं त्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला आहे. तुम्ही बाप निवडू नका, सामान्य शिवसैनिक निवडा अशी हाक बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा दिली होती असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या कोणी नगरसेवक फुटला तर त्याची गाढवावरून धिंड काढण्यात येईल असे म्हणले होते, या वाक्याचा उल्लेख व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. ज्या ठाण्याला शिवसेनेनं समृद्ध केलं ती शिवसेना संकटात आहे, ज्या बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा विचार ठाण्यात पसरत होता तो विचार आता संपवला जातोय असे म्हणत एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल करण्यात आला आहे.

सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com