
निवृत्ती बाबर
मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा २०२३ मधले सर्वाधिक आश्वासक युवा नेते म्हणून गौरव झाला आहे. फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्स, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमकडून या वर्षाच्या यादीत १०० युवा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
जे राजकीय, नाविन्यपूर्ण उपक्रम, परिवर्तनात्मक संशोधनासारख्या गोष्टींमध्ये सहभागी असलेले, भविष्यवादी विचारसरणी असलेल्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये १२० देशांमधल्या तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. यात आदित्य ठाकरे यांच्यासह ७ भारतीय तरुणांचा समावेश केला आहे. (Latest Marathi News)
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि भाजप युवा आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांना ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या युवा आश्वासक नेत्यांच्या यादीत स्थान दिलं. फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्स, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने १०० सदस्यांची यादी तयारी केली होती.
ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये अभिनंदन करत म्हटलं की, '२०२३मधील जगातील सर्वाधिक युवा आश्वासक नेत्यांमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमद्वारे निवड केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांचे खूप खूप अभिनंदन'.
दरम्यान, या यादीत अन्य भारतीय हे व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत होते. संस्थापक आणि सीईओ तन्वी रत्ना, जिओ हाप्टिक टेक्नोलॉजी लिमिटेडचे सहसंस्थापक आणि सीईओ आकृति वैश, टीवीएस मोटर कंपनी लिमिटेडचे प्रबंध निदेशक सुदर्शन वेणू आणि बायोजनचे विबिन बी जोसेफ यांचा सामावेश आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.