वसई-विरार महापालिकेतील बडे अधिकारी ठाणे ACB च्या जाळ्यात, लाच घेताना रंगेहाथ पकडले

वसई-विरार महापालिकेतून खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे.
Thane acb raid to vasai virar municipal corporation authority
Thane acb raid to vasai virar municipal corporation authoritysaam tv

मुंबई : वसई-विरार महापालिकेतून (vasai-virar municipal corporation) खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत ४० हजारांची लाच मागणाऱ्या वसई-विरार महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. वसई-विरार पालिकेतील प्रभाग समिती एफ पेल्हार येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त रुपाली संखे, ठेका अभियंता हितेश जाधव आणि त्यांच्या साथीदार गणेश झणके याला सापळा रचून गुरुवारी एसीबीने अटक केली आहे.

Thane acb raid to vasai virar municipal corporation authority
आमदार भरत गोगावले आणि त्यांचा मुलगा विकास गोगावले यांना जीवे मारण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार महापालिकेच्या या तीन अधिकाऱ्यांनी एका बांधकाम विकासकाकडे जून महिन्यात ४० हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर या प्रकरणाची एसीबीला (Thane ACB) खबर मिळताच त्यांनी आरोपीं विरोधात सापळ रचला. रुपाली संखे,हितेश जाधव आणि गणेश झणके लाच स्विकारण्यासाठी गेले असता ठाणे एसीबीने सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंध विभागाने तिघांना लाच घेतना बिलालपाडा येथे अटक केली आहे.'

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com