Thane Bandh : ठाणे बंदचा नागरिकांना फटका, रिक्षासाठी लांबच लांब रांगा; पोलीस जागोजागी तैनात

Thane News : नौपाड्यातील गोखले रोडवर देखील तुरळक वाहने दिसत आहेत.
Thane News
Thane News Saam TV

विनय म्हात्रे

Thane Bandh News :

मराठा आंदोलनकर्त्यांवर जालना येथे झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. ठाणे बंदला जवळपास सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र या बंदचा नागरिकांना फटका बसताना दिसत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.

ठाण्यातील सर्वाच भागात बंदचा परिणाम दिसून येत आहे. ठाण्यातील नेहमी गजबजलेला नौपाडा परिसरातही आज शुकशुकाट दिसत आहे. नौपाड्यातील गोखले रोडवर देखील तुरळक वाहने दिसत आहेत. (Latest Marathi News)

Thane News
Pune Ganpati in Germany : पुण्याचा मानाचा गणपती निघाला जर्मनीला, म्युनिकमध्ये विराजमान होणार तुळशीबाग गणपतीची प्रतिकृती

रिक्षासाठी लांब रांगा

कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला ठाणे बंदचा फटका बसताना दिसत आहे. बंदमुळे ठाणे शहरात ऑटोरिक्षा बंद आहेत. ज्या रिक्षा सुरु आहेत त्यासाठी प्रवाशांना तब्बल तास ते दीड तास रांगेत उभं रहावं लागत आहे. (Mumbai News)

Thane News
Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील २२ दिवस हार्बर मार्गावर ब्लॉक; रेल्वेच्या काही फेऱ्या रद्द

ठाणे बंदची हाक दिल्यानंतरही काही दुकाने उघडी होती. ही सर्व दुकाने कार्यकर्त्यांकडून बंद केली जात आहेत. व्यापाऱ्यांना हात जोडून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सहकार्य करण्याची विनंती केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com