Thane Dahi Handi 2023: टेंभी नाक्यावर रंगणार दहीहंडीचा थरार; गोविंदा पथकांवर होणार बक्षीसांचा वर्षाव, टीझर प्रदर्शित

Tembhi Naka Dahi Handi 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील टेंभी नाक्याची दहीहंडी प्रसिद्ध आहे. दरवर्षी टेंभी नाक्यावर दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
Thane Dahi Handi 2023 tembhi naka dahi handi price CM Eknath shinde News
Thane Dahi Handi 2023 tembhi naka dahi handi price CM Eknath shinde News Saam TV

Tembhi Naka Dahi Handi 2023:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील टेंभी नाक्याची दहीहंडी प्रसिद्ध आहे. दरवर्षी टेंभी नाक्यावर दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यंदाही ठाणेकरांना टेंभी नाक्यावर गोविंदा पथकांचा थरार अनुभवायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. (Latest Marathi News)

धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरू करून साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. दिघे यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले.

Thane Dahi Handi 2023 tembhi naka dahi handi price CM Eknath shinde News
Sharad Pawar: वाघ हा वाघ असतो, तो कधीच म्हातारा होत नसतो; शरद पवारांच्या सभेआधी जळगावात झळकले बॅनर्स

यंदा पुन्हा एकदा त्याच दिमाखात यंदा अनुभवायला मिळणार आहे. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येतात. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी (Dahi Handi 2023) म्हणून ओळखली जात आहे.

हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवीशक्ती असलेल्या थराकरीता आहे. दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असून साहसी खेळही आहे. या खेळाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील (Thane News) गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १,००,०००/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी ₹ १२,०००, सहा थरांसाठी ₹ ८,००० हजार, पाच थरांसाठी ₹ ६००० तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी ₹ ५००० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणा-या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

Thane Dahi Handi 2023 tembhi naka dahi handi price CM Eknath shinde News
Janmashtami Special 2023: जन्माष्टमीला बाळ गोपाळांना पंजिरीचा नैवेद्य का अर्पण केला जातो? कारणं आहे खास

या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com