
Thane Dombivli Fraud News: पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून ३३ वर्षीय महिलेची तब्बल १२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार डोंबिवली परिसरात घडला आहे. श्रिया गंगाधर खडगी असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Online Fraud News)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गरीबाचापाडा (GaribachaPada) परिसरात राहणारी तरुणी श्रिया गंगाधर खिडगी ही मुंबईत (Mumbai) एका खासगी कंपनीत काम करते. अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात तिने ऑनलाइन साईडवर पार्ट टाईम जॉब शोधायला सुरुवात केली. एका ऑनलाईन भामट्याने त्यांच्याशी संपर्क करत आमच्याकडे जॉब असल्याचे सांगितले.
या आमिषाला बळी पडून तक्रारदार महिलेने नोकरीची ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण केली. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होती. सायबर चोरट्यांनी तिला टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आणि प्रत्येक कामासाठी पैसे कमवून विविध सोशल मीडिया लिंक्ससह व्यस्त राहण्याची सूचना केल्या.
सुरुवातीला तक्रारदार महिलेने थोडी रक्कम दिली आणि चांगले उत्पन्न मिळाले. या नोकरीवर तिचा विश्वास वाढल्याने तिने 12.5 लाख रुपये भरून गुंतवणूक करणे सुरू ठेवले. मात्र यानंतर तिला तिच्या गुंतवणुकीवर कोणतेही पेमेंट किंवा परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. विष्णुनगर ठाण्याचे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.