Thane News: औषधांच्या ओव्हर डोसमुळे ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू? शवविच्छेदनास विरोध करत मृतदेह घेऊन बाप रुग्णालयातून पसार; प्रकरण काय?

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital Thane: पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ डायघर येथून बापाला ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात आणले आहे.
Thane Kalwa Hospital News
Thane Kalwa Hospital NewsSaam tv

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

Thane News: शवविच्छेदन नको म्हणून आपल्या 8 महिन्याच्या मुलाचा मृतदेह घेऊन वडिलांनी पोबारा केल्याची घटना ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ झाला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ पोलिसांना देण्यात आली, ज्यानंतर मुलाच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Thane Latest News)

Thane Kalwa Hospital News
Jawan Vs Pathan Movie: रेकॉर्डब्रेक करूनही 'पठान'ला मागे टाकण्यात 'जवान' अयशस्वी, आतापर्यंतच्या कमाईचा आकडा किती?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवारी रात्री १०:३० च्या दरम्यान या ८ महिन्याच्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र आज पहाटे उपचारा दरम्यान या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते त्या वेळी निमोनिया आणि खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस दिल्याचे आढळून आले होते.

बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शव विच्छेदन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर बाळाच्या वडिलांनी त्यास विरोध केला आणि वार्डमधून आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन सरळ पसार झाला. ही घटना घडल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ झाला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ डायघर येथून बापाला ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात आणले आहे. बाळाचा मृतदेहही रूग्णालयात आणण्यात आलेला आहे. बाळाला घेवून जात असताना सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा विरोध जुगारून पळून जाण्यात संबंधिताला यश आले. या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Thane Kalwa Hospital News
Rasta Roko Andolan : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; युवा सेनेचा पंढरपूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com