धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

अंबरनाथच्या चिखलोली धरणात रविवारी बुडाली होती मुलं
धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले
धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडलेSaam Tv

अंबरनाथ - चिखलोली धरणात पोहण्यासाठी आलेली दोन मुलं धरणात बुडाल्याची घटना रविवारी घडली होती. या मुलांचे मृतदेह अखेर आज दोन दिवसांनी सकाळी पाण्याच्या वर आले आहे. सार्थक ओमले आणि महादेव मिस्त्री अशी या दोघांची नावं होती. हे दोघेही अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मी नगर टेकडी परिसरात वास्तव्याला होते. विद्यार्थी असलेले हे दोघे रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाले.

हे देखील पहा -

याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बोटीच्या साहाय्याने या दोन मुलांचा शोध सुरू केला. मात्र सतत दोन दिवस शोध घेऊनही हे दोघे सापडू शकले नव्हते. अखेर आज मंगळवारी सकाळी या दोघांचेही मृतदेह पाण्यावर येऊन तरंगू लागले. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com