Buldhana Crime: बस स्थानकातून बसच गेली चोरीला! देऊळगाव राजा येथील धक्कादायक घटना

Buldhana Latest News: बस स्थानकात मुक्कामी बस उभी करून बसचे चालक आणि वाहक विश्रांती कक्षात झोपलेले होते.
Buldhana Bus News
Buldhana Bus Newsसंजय जाधव

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. देऊळगाव राजा येथील बस स्थानकात उभी असलेली एसटी बस अज्ञाताने चक्क चोरून नेली होती. याबाबत एसटी बस चालकाकडून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या बसचा शोध लागला आहे, मात्र ही बस कुणी आणि का पळवली याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. (Buldhana Latest News)

Buldhana Bus News
Fire In Mumbai: चेंबूरमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग; लाखोंचं नुकसान, जीवितहानी नाही

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास देऊळगाव (Buldhana) राजा बस स्थानकात मुक्कामी बस उभी करून बसचे चालक आणि वाहक विश्रांती कक्षात झोपलेले होते. यावेळी त्याची MH 07 C 9273 या क्रमांकाची मानव विकास मिशनची बस (ST Bus) अज्ञाताने बस स्टँड आवारातून गायब केली. याबाबत एसटी बसच्या चालकाने देऊळगाव राजा पोलिसात तक्रार दिली. हे प्रकरण समोर आल्यावर एकच खळबळ उडाली.

मात्र, सदर बस अज्ञाताने सुरू करून चिखली मार्गाने जाताना बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर एका गतिरोधकावर बसचा सेंट्रल जॉईंट निखळला. त्यामुळे नादुरुस्त अवस्थेत ही बस रस्त्यात उभी करून अज्ञाताने पोबारा केला आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन हे प्रकरण चौकशीवर ठेवलं आहे. मात्र या बाबतीत एसटी कर्मचारी आणि पोलीस काहीही माहिती देण्यास तयार नाहीत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com