Mumbai Police चे काम कौतुकास्पद! नाल्यातून वाहत जाणाऱ्या बाळाचे वाचवले प्राण; मांजराच्या आवाजाने लोकं झाले Alert

मांजरानी ओरडण्यास सुरवात केली होती. मांजराच्या ओरडण्याने आजूबाजूची लोकं अलर्ट झाली. तेव्हा ही घटना उघडकीस आली
Mumbai Police चे काम कौतुकास्पद! नाल्यातून वाहत जाणाऱ्या बाळाचे वाचवले प्राण; मांजराच्या आवाजाने लोकं झाले Alert
Mumbai Police चे काम कौतुकास्पद! नाल्यातून वाहत जाणाऱ्या बाळाचे वाचवले प्राण; मांजराच्या आवाजाने लोकं झाले AlertSaam Tv

मुंबई : मुंबईमध्ये Mumbai नवजात बाळाला वाचवण्याची अनोखी घटना समोर आली आहे. घाटकोपर या ठिकाणी असलेल्या पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यामध्ये वाहून जात होते. बाळ पाण्यात वाहून जात असताना सुरुवातीला मांजराने बघितले. त्यानंतर मांजरानी ओरडण्यास सुरवात केली होती. मांजराच्या ओरडण्याने आजूबाजूची लोकं अलर्ट झाली. तेव्हा ही घटना उघडकीस आली आहे.

हे देखील पहा-

आजूबाजूच्या लोकांना लगेच पोलिसांनी या घटनेविषयी माहिती देण्यात आली आहे.घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नवजात बाळाला नाल्यामधून बाहेर काढले आहे आणि रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, त्या नवजात अर्भकाला कपड्यामध्ये गुंडाळण्यात आले होते. त्याला बघून मांजरीने आवाज करायला सुरुवात केली.

यानंतर लोकांचे लक्ष त्या नवजात अर्भकाकडे गेले. त्याला बघताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे निर्भया पथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलीस पथकाने त्या बाळाला नाल्यातून बाहेर काढले आणि राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Mumbai Police चे काम कौतुकास्पद! नाल्यातून वाहत जाणाऱ्या बाळाचे वाचवले प्राण; मांजराच्या आवाजाने लोकं झाले Alert
सुपरस्टार विजयला मिळाली घरात बॉम्ब असल्याची धमकी, पोलिसांचा तपास सुरू

मात्र, आता नवजात अर्भक धोक्याबाहेर असून प्रकृती उत्तम आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये नवजात बालकाचा फोटो देखील शेअर केला आहे. मात्र, या बाळाला नाल्यात सोडणाऱ्या आई- वडिलांची अद्याप ओळख पटली नाही. या संदर्भात मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com