Mumbai Bank Case: मविआ सरकारचं माझ्या विरोधात षडयंत्र; दुसऱ्यांदा चौकशीमुळे दरेकरांचा आरोप

Pravin Darekar latest News: आज दुसऱ्यांचा चौकशी होणार आहे. त्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीन सरकारने आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे.
The conspiracy of the MVA government against me Sai Pravin Darekar
The conspiracy of the MVA government against me Sai Pravin Darekar Saam Tv

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: मुंबई जिल्हा बॅंकेतील तथाकथित गैरव्यवहाराप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून सातत्याने आरोप सुरु आहेत. दरेकर मजूर नसताना त्यांनी मजूर प्रवर्गातून मुंबई जिल्हा बॅंकेतील (Mumbai District Central Co-operative Bank Ltd) निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला असा आरोप त्याच्यावर होत आहे. याबाबत दरेकरांची (Pravin Darekar) आज दुसऱ्यांचा चौकशी होणार आहे. त्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीन सरकारने आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. (The conspiracy of the MVA government against me; Darekar's allegation due to second probe in Mumbai Bank labor scam)

हे देखील पहा -

याबाबत प्रवीण दरेकर म्हणाले की, एकदा सखोल चौकशी झाल्यावर पुन्हा का गरज लागली असा सवास उपस्थित करत छळायच्या उद्देशाने बोलावले आहे असा आरोप त्यांनी सरकारवर केला. तसेच कितीही वेळा बोलवलं तरी चौकशीला जाऊ असंही ते म्हणालेत. अगोदरच्या चौकशीत सर्वच प्रश्नाची उत्तरं दिली असून आजच्या चौकशीलाही शांतपणे सामोरं जाणार असं ते म्हणाले. आप पक्षाबद्दल ते म्हणाले की, आप पक्षाला दुसरं काही काम नाहीय, अनेक अपप्रवृत्ती आहेत त्याकडे आपने लक्ष द्यावे. तसेच आमचे विरोधकांनी हातमिळवणी करून एकत्रित केलेले हे षडयंत्र आहे असा आरोपही त्यांनी केला.

The conspiracy of the MVA government against me Sai Pravin Darekar
शताब्दी एक्सप्रेसमध्ये विस्टाडोम कोच सुरु; नयनरम्य दृश्यांसह होणार गारेगार प्रवास

मुंबई बॅंक मजूर घोटाळ्यातील बेछूट आरोपांप्रकरणी आपण नाना पटोले, भाई जगताप आणि धनंजय शिंदे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तसेच सोमय्यांबाबत ते म्हणाले की, सोमय्यांनी आज जामीनासाठी अर्ज केलेला आहे. निकाल येईपर्यंत पोलिसांसमोर जात नाही, निकाल आल्यानंतर ते पोलीस स्टेशनला जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com