Pune: लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळला जोडप्याचा मृतदेह; परिसरात खळबळ

या जोडप्यामध्ये विवाहबाह्य संबंध होते का? याचा दिघी पोलिस तपास करत आहेत.
Pune: लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळला जोडप्याचा मृतदेह; परिसरात खळबळ
Pune: लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळला जोडप्याचा मृतदेह; परिसरात खळबळSaam TV

पुणे : पुणे - आळंदी रोडवरील लॉजमध्ये एका जोडप्याचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने दिघी परिसरात खळबळ उडाली आहे. लॉजच्या रूममध्ये महिला मृतावस्थेत तर पुरुष गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. प्रकाश ठोसर आणि वैशाली चव्हाण अस या घटनेनत मृत्यूमुखी पडलेल्या जोडप्याचं नाव आहे. हे दोन्ही चिंचवडच्या अजिंठा नगरमध्ये  राहणारे असून, या जोडप्यामध्ये विवाहबाह्य संबंध होते का? याचा दिघी पोलिस तपास करत आहेत.

प्रकाश महादेव ठोसर (वय २८, रा. अजंठानगर, चिंचवड) याने आत्महत्या केली. तर ३५ वर्षीय महिलेचा खून झाला आहे. पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेली माहितीनुसार, प्रकाश अविवाहित असून महिला विवाहित आहे. हे दोघेही दिघीतील मॅगझीन चौकातील एका लॉजवर आले होते. त्यांच्यात काहीतरी कारणावरून वाद झाला, यामध्ये प्रकाश याने महिलेचा गळा दाबला आणि तिचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत आढळले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com