एका आईस्क्रीमच्या नादात दुचाकीस्वाराने गमावला जीव

मुंबईच्या लोअर परळ ब्रिजवरील एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत होता
एका आईस्क्रीमच्या नादात दुचाकीस्वाराने गमावलं जीव
एका आईस्क्रीमच्या नादात दुचाकीस्वाराने गमावलं जीवसुरज सावंत

मुंबई : मुंबईच्या लोअर परळ ब्रिजवरील एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत होता. ब्रिजवर घेतलेल्या अचानक 'यू टर्न' मुळे समोरून वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चालक अमित कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. अचानक घेतलल्या या यू टर्न मागचे कारण जेव्हा पोलिसांनी त्याला विचारले. त्यावेळी मुलीला आईस्क्रीम हवे असल्याने गाडी ब्रिजवर अचानक फिरवल्याचे त्याने सांगितले आहे.

मुंबईच्या लोअर परळ परिसरात राहणारा अमित कुमार हा एका नामकिंत क्लबमध्ये पीसीआर मॅनेजर म्हणून काम करतो. २९ सप्टेंबरला रात्री अमित हा दादरच्या दिशेने कारने वेगात जात होता. अचानक त्याच्या पत्नीचा फोन आला आणि मुलीला आईस्क्रीम खायचं असल्याचं तिनं अमितला सांगितलं.

हे देखील पहा-

लाडक्या मुलीचे लाड पुरवण्याच्या नादात अमितने ही पुढचा मागचा विचार न करता. वाहत असलेल्या रस्त्यात ब्रिजवर दिसलेल्या मोकळ्या जागेतून मागे गेलेल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जाण्यासाठी त्याने गाडी वळवली. याच वेळी दुसऱ्या बाजूने वेगात येत असलेल्या दुचाकीस्वार भावेशने ते पाहिलं. मात्र, गाडीचा वेग पाहता गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भावेशच्या गाडीने अमितच्या गाडीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती, की वेगात दुचाकीहून आलेला भावेश हा कारला धडकल्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकला गेला आणि त्या मार्गावरून येणाऱ्या दुचाकी स्वाराच्या गाडीखाली आला आहे. मात्र, हा अपघात पाहताच, घाबरलेल्या अमितने तेथून पळ काढला. अपघाताचा हा संपूर्ण थरार ब्रिजवरील सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

या अपघातानंतर दोन्ही दुचाकीस्वारांना तातडीने सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी भावेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मात्र, दुसरीकडे या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत सीसीटिव्हीच्या मदतीने चालकाची ओळख पटवण्यासाठी गाडीच्या नंबरहून त्याचा शोध सुरू केला आहे. त्यावेळी गाडी लोअरपरळच्या एका सोसायटीबाहेर दिसली.

एका आईस्क्रीमच्या नादात दुचाकीस्वाराने गमावलं जीव
Nagpur; देवेंद्र फडणवीस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

पोलिसांनी चौकशीअंती अमितल ताब्यात घेतले आहे. चौकशीत अमितनेही गुन्ह्याची कबूली दिली आहे. मात्र, अचानक ब्रिजवर यू टर्न मारण्यामागचं कारण त्याला जेव्हा विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने मुलीला आईस्क्रीम हवे असल्याचा पत्नीचा फोन आला होता. कोरोनामुळे दिलेल्या वेळेत दुकानदार दुकानं बंद करतात. जर तसं झालं तर आईस्क्रीम मिळणार नाही. त्यामुळेच जागेवरच यू टर्न मारल्याची कबूली अमितने पोलिसांना दिली आहे.

न्यायालयाने अमितला १५ हजाराच्या जामीनावर मुक्त केलं आहे. मात्र, हा अपघात पाहता पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करा, वेगात गाडी चालवू नका. अन्यथा एक छोटीशी चूक महागात पडू शकते. तर नागरिकांचा हा बेजबाबदार पणा कधीतरी जिवावरही बेतू शकतो. यामुळे वाहतूक नियमांचे पालन करा. असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com