महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले; उपमुख्यमंत्री म्हणाले केंद्राने...

ओमायक्रॉन बाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले; उपमुख्यमंत्री म्हणाले केंद्राने...
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले; उपमुख्यमंत्री म्हणाले केंद्राने...Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई - राज्यात ओमायक्रॉन धोका वाढला असून डोंबिवलीसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रुग्ण सापडले आहेत. त्याच पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. यामुळे करोनाचा उद्रेक पाहिलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कठोर नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हे देखील पहा -

ओमायक्रॉन बाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. सध्या वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्याबाबत कडक भूमिका केंद्राने घ्यायला हवी. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळवर नियमांचे पालन होतं आहे की नाही याकडे लक्ष द्यायला हवं. कारण कोरोनाची सुरुवात मुळात भारतात एक जोडपं दुबई वरून आलं होतं आणि त्यांनी प्रवास केल्यानंतर त्यांच्या सोबतच्या ड्राइव्हरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा प्रसार झाला होता.

आत्ताच्या देखील काळात वेगवेगळ्या राज्यात एक दोन रुग्ण सापडत आहेत. देशपातळीवर आरोग्य विभाग आणि डब्ल्यूएचओ नवं नियमांबाबत एक सूचना काढणं गरजेचं आहे. जे दोन डोस घेतलेले आहेत त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे बूस्टर डोस बाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा. आपल्याकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत असे देखील अजित पवार यावेळी म्हणले.

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले; उपमुख्यमंत्री म्हणाले केंद्राने...
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विरोधात जिल्हा पोलीस दलाची धडक कारवाई...

पुढे ते म्हणले की, राजकीय लोकांच्या लग्नात प्रचंड गर्दी पाहिला मिळाली. लोकं अजिबात ऐकत नाहीत. त्यामुळे देशपातळीवर नियमांबाबत निर्णय झाला तर प्रत्येक राज्य त्याची अंमलबजावणी करेल. बूस्टर डोस बाबत चर्चा सुरू आहे त्यामुळे ज्यांनी याबाबत संशोधन केले त्यांनी स्पष्ट करावे बूस्टर डोस घ्यायचा का नाही ते. पुण्यात जे कुटुंबीय बाधित आहेत त्यामध्ये लहान मुलांना बाधा झाली आहे. त्यामुळे केंद्राने आणि डब्ल्यूएचओने याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची नितांत गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com