एकविरा आईच्या मंदिर परिसराची दुरवस्था; मनसेनं ठोकलं तिकीट घराला टाळं...

एकविरा आईच्या गडावर जाताना ठिकठिकाणी बाजूला प्लॅस्टिक व कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. इतर देवस्थानांप्रमाणे सुखसुविधा नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एकविरा आईच्या मंदिर परिसराची दुरवस्था; मनसेनं ठोकलं तिकीट घराला टाळं...
एकविरा आईच्या मंदिर परिसराची दुरवस्था; मनसेनं ठोकलं तिकीट घराला टाळं...दिलीप कांबळे

पुणे: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मावळमधील कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने भाविक व पर्यटकांचे अतोनात हाल होत आहेत. मंदिर परिसर मात्र आता समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून पिण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ भविकांवर आली आहे. याबाबत आता मावळ मनसे आक्रमक झाली आहे. कार्ला गडावरील पुरातत्व विभागाचे तिकीट काउंटर देखील मनसेच्या वतीने बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत कार्ला गडावर येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा दिल्या जात नाही तोपर्यंत पुरातत्व विभागाचे तिकीट काउंटर सुरू करून न देण्याचा इशारा मावळ मनसेचे अशोक कुटे यांनी दिला आहे. (The dilapidated condition of the temple premises of Ekvira Aai; MNS locks the ticket house)

हे देखील पहा -

मागील पंधरा दिवसांपासून गडावर पिण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने दुषित पाणी पिण्याची वेळ भविकांवर आली आहे. गडावर जाताना ठिकठिकाणी बाजूला प्लॅस्टिक व कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. गडावर पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत कराव्या लागणाऱ्या प्रवासात भाविक व पर्यटक यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. शौचालयेदेखील असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे एवढे मोठे धार्मिक स्थळ असूनदेखील इतर देवस्थानाप्रमाणे सुखसुविधा नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com