अदानींच्या वाहनाचे सारथ्य; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, तर चर्चा होऊद्यात!

'शरद पवारांनी आपल्या पुस्तकात देखील म्हंटल होतं की, मी अदानींना खूप वर्षांपासून ओळखतो,
Rohit Pawar/Gautam Adani
Rohit Pawar/Gautam AdaniSaam TV

सिद्धेश म्हात्रे -

नवी मुंबई : 'मी गौतम अदानींची गाडी चालवली याची चर्चा होत असेल तर होऊद्यात' असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बारामतीमध्ये प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या गाडीचं सारथ्य केल्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी अदानींची गाडी चालवली त्यांच्या कृत्यामुळे त्यांच्यावरती विरोधकांनी टीका केली होती. तर सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर टीका केली जात होती.

या सर्व प्रकरणावर पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या पुस्तकात देखील म्हंटल होतं की मी अदानींना खूप वर्षांपासून ओळखतो, स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने ती मैत्री निभावत असतो. लपवून छपवून बाकी करतात तसे करत नाही. जर एखादा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येत असेल तर त्यांची गाडी आपण चालवली असेल तर त्यात गैर काय आहे.

या घटनेवरून भाजपचे (BJP) लोकं जे पतंग उडवताहेत ते त्यांनी उडवू नये, त्यांना तेवढंच कळतं शिवाय मी अदानींची गाडी चालवली याच्या चर्चा होत असतील तर होऊद्यात असंही रोहित पवार यावेळी म्हणाले. ते आज नवी मुंबईतील (Navi Mumbai) कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.

हे देखील पाहा -

तसंच निवडणुका आल्या की चर्चा ह्या होणारच, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी शिवसेनेच्या अपक्षांना फोन केला असेल तर असं म्हणत असतील तर ती फक्त चर्चाच आहे. याबाबत कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. निवडणुकीच्या अगोदर ३ दिवस भाजप अशाच काही पुड्या सोडत असतात, ही तर भाजपची रणनीती आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

शिवाय राष्ट्रवादीची दोन मतं कमी झाली हे भाजपला शुभशकुन वाटत असेल तर जी दोन मत कमी झाली त्यांचा आरोप सिद्ध न होता त्या २ लोकांना जेलमध्ये ठेवलं जातं असेल, सीबीआय आणि ईडीचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

याला भाजप शुभशकुन म्हणत असले तरी ते सविधांनाच्या विरोधात आहेत. त्या भाजपला शुभच असतील, त्याशिवाय ते निवडणून येऊ शकत नाहीत. भाजप लोकशाहीला सतत फाटा देत आहे. त्यांनी काही बोललं तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पक्ष काळजी घेऊन येणारी निवडणूक लढतील असा विश्वास असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com