आंदोलनाची यापुढची भूमिका कामगारांनी ठरवावी- सदाभाऊ खोत

आंदोलन कामगारांनी उभे केले आहे. यामुळे त्याविषयीचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा.
आंदोलनाची यापुढची भूमिका कामगारांनी ठरवावी- सदाभाऊ खोत
आंदोलनाची यापुढची भूमिका कामगारांनी ठरवावी- सदाभाऊ खोत Saam Tv

मुंबई : हे आंदोलन कामगारांनी उभे केले आहे. यामुळे त्याविषयीचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा. आज यशवंतराव चव्हाणांचा Yashwantrao Chavan स्मृतीदिन आहे. या दिवशी कामगारांनी निर्णय घ्यावा. आझाद मैदानावरचे Azad Ground आंदोलन तात्पुरते मागे घेत आहोत. बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की तसेच ठेवायचे, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा, असे वक्तव्य आज पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली आहे.

आंदोलन चालू ठेवले तर त्यांना पाठिंबा राहिलच, मात्र तो निर्णय त्यांनीच घ्यावा, असे मत सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला आहे. यावेळी ते म्हणाले आहेत की, मागील अनेक वर्षे या कामगारांची मागणी होती. वेळेत पगार आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावी मागणी होती. शासनाकडून डोळेझाक करण्यात आले आहे. त्यानंतर कामगारांनी संघटनाव्यतिरिक्त संपाची हाक डेन्ह्यात आली आहे. तुटपुंज्या पगारामध्ये घरखर्च, मुलांचे शिक्षण वगैरे गोष्टी भागत नव्हते.

हे देखील पहा-

सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून १६ दिवस त्यांच्याबरोबर आझाद मैदानामध्ये बसलो होतो. विलीनीकरण झाल्यानंतर आमचा प्रश्न सुटणार आहे, अशी कामगारांची भावना निर्माण झाली होती. याच भावनेतूनच संघटनेशिवाय कामगारांनी यावेळी संप पुकारला आहे. आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहिलो आहोत. पुढे ते म्हणाले की, सरकारने पगारवाढ करुन देखील तोपर्यंत दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनाची यापुढची भूमिका कामगारांनी ठरवावी- सदाभाऊ खोत
पाकिस्तान ड्रोनने पाठवले भारताला 11 टिफिन बॉम्ब; निशाण्यावर काही RSS चे नेते?

कामगारांचं हे महत्वाचे यश आहे, असे मी समजतो. मूळ वेतनात ही वाढ झाली आहे. ही वाढ अनेकवर्षे झाले तरी देखील करण्यात आली नव्हती. कामगारांचा हा पहिल्या टप्प्यातला विजय आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या अगोदर पगार देण्याला सरकार बांधील राहणार आहे, अशी सरकारची भूमिका आहे. एका बाजूला विलीनीकरणाचा आमचा लढा सुरुच राहणार आहे. दुसऱ्या बाजूला सरकार २ पावले पुढे आले आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही दुसरा टप्प्यातला लढा देखील उभा करु. सर्व कामगारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. सरकारने कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे जे कामगार कामावर हजर राहणार आहेत, त्यांचे निलंबन मागे घेण्यात येणार आहे, असे सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com