बारवी धरणाचे दरवाजे उघडले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका - कडोंमपा

ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याची अफवा पसरली आहे.
बारवी धरणाचे दरवाजे उघडले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका - कडोंमपा
बारवी धरणाचे दरवाजे उघडले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका - कडोंमपाSaam Tv News

गेल्या काही दिवसांत ठाणे जिल्ह्याला Thane dis मुसळधार पावसाने झोडपलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा अनेक ठिकाणच्या काही भागात पाणी भरल्याने काही ठिकाणी नागरिकांना रेस्क्यू करावे लागले. अशा परिस्थितीत बदलापूर येथील बारवी धरणाचे दरवाजे उघडले गेल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने खळबळ माजली आहे. The gates of Barvi Dam have not been opened, don't believe the rumors said KDMC

धरणाचे दरवाजे उघडल्याची बातमी खोटी असून नागरिकांना अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान कल्याण - डोंबिवली महानरपालिकेने केले आहे. बारवी धरणाची ओव्हर फ्लो लेवल 72.60 मी. इतकी असून सध्या बारवी धरणाची पाण्याची पातळी 67.50 मी. इतकी आहे. त्यामुळे बारवी धरणाचा दरवाजा लगेच उघडण्याची शक्यता अजिबात नाही. तरी नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये, तसेच मुसळधार पावसात अनावश्यक बाहेर पडू असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com