मोठ्या पक्षात फूट पडणार, सरकार बरखास्त होणार; ज्योतिष्यांचं भाकीत खरं ठरतय ?

गृहस्थितीचा विचार करता मे आणि जून या महिन्यांमध्ये राजकीय क्षेत्रात स्फोटक घटना घडू शकतात असं भाकीत काही ज्योतिष्यांनी या आधीच केलं होतं
मोठ्या पक्षात फूट पडणार, सरकार बरखास्त होणार; ज्योतिष्यांचं भाकीत खरं ठरतय ?
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Vs MVA GovermentSaam TV

मुंबई : शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सोमवार दिनांक २० जून रोजी हे बंड पुकारल्याचं थेट गुजरातमधून जाहीर केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं.

शिवाय आता शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी देखील आता विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे सरकार अस्थिर झालं असून ते कधीही कोसळणार अशी शक्यता असतानाच, आता एक राजकीय भाकीत समोर येत असून त्यांनी केलेल्या दाव्यानुसारच या घडामोडी घडत आहेत की काय? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत जोतिष्य अमित विभुते यांनी 'युती रिटर्न' असं भाकत केलं होत. त्यामुळे ही भविष्यवाणी खरी ठरतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, सध्याच्या घडामोडी बघता महाविकास आघाडी सरकार सत्तेच्या अंतिम घटका मोजत आहे.

हे देखील पाहा -

गृहस्थितीचा विचार करता मे आणि जून या महिन्यांमध्ये राजकीय क्षेत्रात स्फोटक घटना घडू शकतात. तसंच मोठ्या राजकीय घडोमोडी होण्याची शक्यता आहे. एकाद्या मोठ्या राज्यातील सरकार पडेल किंवा केंद्रिय आणि राज्य मंत्रीमळात काही बदल होतील असं भाकीत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी जानेवारी महिन्यात केले होते.

दरम्यान, 'सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनपेक्षीत बदल होतील, मे-जून महिन्यात राजकीय क्षेत्राच अनेक विस्फोटक परिवर्तन होऊ शकतं तसंच फेब्रुवारीमध्ये 'युती रिर्टन' असं मी सांगितलं होतं. मागच्या जून मध्येही येत्या वर्षात या सरकारच भविष्य कसोटीचं असल्याचं आपण आधीचं सांगितलं होते. शिवाय पुढच्या वर्षी बदल बघायला येतील असं भाकीत आपण आपल्या सोशल साईट्स वर टाकल्याचं ज्योतिष अमित विभुते यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितं.

दरम्यान, हे सर्व आपण ज्या 'रिअल टाईम परिस्थिती' असतात त्या आधारे हे भाकीत करतो. इतर विषयांमध्ये ज्या प्रकारे संशोधन होतं त्यानुसार लोकांच्या आयुष्याचं संशोधन करुन आपण हे भाकीत करतो असं त्यांनी सांगितलं.

त्यांना हे सर्व आपण सांगितलेलं योगायोगाने घडतय की अभ्यास करुन तुम्ही सांगितलं आहे, यावर ते म्हणाले आम्ही महाराष्ट्र आणि भारताची पत्रिका काढतो त्यानुसार हे भाकीत करतो. शिवाय याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Ajit Pawar and Devendra Fadnavis) यांनी पहाटे शपथ घेतली त्याचवेळी आपण राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार स्थापन होणार असं सांगितलं असल्याचा दावा केला. तसंच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे आता या ज्योतिषांनी केलेली भाकीत योगायोग आहे की खरं घडतय याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com