अखेर डोंबिवलीकरांची प्रतिक्षा संपली, कोपर उड्डाणपूल होणार वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुलाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा होणार आहे.
अखेर डोंबिवलीकरांची प्रतिक्षा संपली, कोपर उड्डाणपूल होणार वाहतुकीसाठी खुला
अखेर डोंबिवलीकरांची प्रतिक्षा संपली, कोपर उड्डाणपूल होणार वाहतुकीसाठी खुलाप्रदीप भणगे

डोंबिवली : अनेक महिन्यांपासून कोपर पूलाच्या kopar Bridge तारखा दिल्या जात होत्या. अखेर हा तारखांचा सिलसिला संपल्यात जमा असून गणेश चतुर्थीच्या अगोदर हा पूल खुला होणार असे शिवसेनाSivsena माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले होते.त्याप्रमाणे हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या हस्ते पुलाचा ऑनलाईन Online लोकार्पण सोहळा 7 सप्टेंबरला दुपारी 1 च्या सुमारास होणार आहे. The Kopar flyover will be open to traffic

हे देखील पहा-

कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे 15 सप्टेंबर 2019 पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलावरील वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपुलावरून वळविण्यात आली होती. मात्र हा पूल अरुंद असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडीचा ताण येत होता. यामुळे कोपर पुलाचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी वारंवार होत होती. पालिका प्रशासनाने तीन ते चार वेळा काम पूर्ण होण्याची तारीख दिली. मात्र दिलेल्या वेळेत कामाचे उद्दिष्ट गाठणे त्यांना शक्य झाले नाही.

अखेर डोंबिवलीकरांची प्रतिक्षा संपली, कोपर उड्डाणपूल होणार वाहतुकीसाठी खुला
Money Heist Song | Money Heistच्या गेटअपमधून कोण देतय लसीकरणाचा संदेश (पहा व्हिडीओ)

अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या पुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या मंगळवारी तो वाहतुकीसाठी खुला होईल. मंगळवारी दुपारी 1 वाजता कल्याण-डोंबिवली मधील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा उदघाटन सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडणार आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे कार्यक्रम पार पडेल. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com