Kalyan Crime: प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; विवाहित प्रियकराने कायमचाच काढला काटा

लग्न करण्यासाठी प्रेयसी वारंवार आपल्या विवाहित प्रियकराकडे तगादा लावत असल्याने रागाच्या भरात प्रियकराने प्रियसीचा कायमचाच काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली
Kalyan Crime: प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; विवाहित प्रियकराने कायमचाच काढला काटा
Kalyan Crime: प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; विवाहित प्रियकराने कायमचाच काढला काटाSaam Tv

सिद्धेश म्हात्रे

कल्याण: लग्न करण्यासाठी प्रेयसी वारंवार आपल्या विवाहित प्रियकराकडे तगादा लावत असल्याने रागाच्या भरात प्रियकराने प्रियसीचा कायमचाच काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सागर हा कल्याण (Kalyan) येथील रहिवासी असून सध्या बेरोजगार होता. तर मृत प्रेयसी प्रतिभा ही मुलुंड (Mulund) येथील रहिवासी असून एक रुग्णालयात (hospital) नर्स म्हणून काम करत होती. दोघांमध्ये मागील 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

हे देखील पहा-

प्रतिभा नेहमीच सागरकडे लग्नासाठी तगादा लावत असत. मात्र, सागरचे लग्न (married) आधीच झाले आहे. त्याला 2 मुले देखील आहेत. रोज होणाऱ्या या त्रासातून कायमचा मार्ग काढण्याच्या दृष्टीने सागरने अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुधवारी रात्री तुर्भे येथील साई प्रणव लॉजवर आरोपी (Accused) सागरने प्रेयसी प्रतिभाला बोलावले होते. दोघांनी संपूर्ण रात्र या लॉजवर घालवण्याचा निर्णय घेतला होता. रात्र सरली मात्र, सकाळी दोघांमध्येही प्रचंड भांडण सुरू झाली.

Kalyan Crime: प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; विवाहित प्रियकराने कायमचाच काढला काटा
Jammu Kashmir: शोपियानच्या चकमकीत भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा

यादरम्यान सागरने प्रेयसी प्रतिभाचा गळा आवळून खून केला आहे. लॉज चालक वरती रूममध्ये जाऊन पाहिले असता प्रतिभा बेशुद्धावस्थेत पडली होती. लॉज चालकाने प्रतिभाला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. यावेळी पोलिसांच्या (police) तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सागरला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत त्याची अधिक चौकशी केली असता. लग्नाचा तगादा लावत असल्याने आपणच प्रतिभाचा गळा आवळून खून केला असल्याची कबुली दिली असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com