Mumbai Local : लोकलच्या मोटरमनला अचानक आली भोवळ अन्... मालाड स्थानकातील धक्कादायक प्रकार

चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या धिम्या लोकलच्या मोटरमनला अचानक चक्कर आली आणि तो थेट केबिनमध्ये पडला.
Mumbai Local
Mumbai Localsaam tv

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Local Train : मुंबई लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी मुंबई लोकल हेच सर्वोत्तम साधन असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लोकलचे मोटारमन ३६५ दिवस न थकता काम करत असतात. मात्र याच मोटरमनच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

Mumbai Local
Kirit Somaiya : 'हिसाब तो लेकर रहेंगे', अनिल परबांच्या 'त्या' आरोपाला किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर

मंगळवारी (३१ जानेवारी) दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या धिम्या लोकलच्या मोटरमनला अचानक चक्कर आली आणि तो थेट केबिनमध्ये पडला.

सुदैवाने लोकल मालाड स्थानकावर थांबली असल्याने मोठा अनर्थ टळला. जर धावत्या ट्रेनमध्ये ही घटना घडली असती, तर मात्र मोठा अपघात घडला असता. मनीष कुमार असं चक्कर येऊन पडलेल्या मोटरमनचं नाव आहे. (Mumbai Local Train)

Mumbai Local
Pandharpur News : आईवर हल्ला करत दिवसाढवळ्या तरुणीला पळवलं; एकतर्फी प्रेमातून तरुणाने केलं भलतंच कांड

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने मनीष यांच्याकडे धाव घेतली. ताबडतोब डॉक्टरांना बोलावून मनीष कुमार यांची तपासणी देखील करण्यात आली. आता मनीष कुमार यांची तब्येत स्थिर आहे. मात्र, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मोटरमन दबावखाली असल्याची कुजबुज रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com