लग्न समारंभांतील गर्दीचा हॉल मालकाला दणका; पालिकेने केला 50 हजारांचा दंड

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचार बंदी करण्यात आली असून कोरोनाचे (Corona) रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने शासनाने नवीन नियमावली देखील जारी केली आहे.
लग्न समारंभांतील गर्दीचा हॉल मालकाला दणका; पालिकेने केला 50 हजारांचा दंड
लग्न समारंभांतील गर्दीचा हॉल मालकाला दणका; पालिकेने केला 50 हजारांचा दंडचेतन इंगळे

वसई/विरार : विरार पूर्वेच्या गुरुकृपा हॉल (Gurukrupa Hall) मध्ये रविवारी सुरू असलेल्या लग्न समारंभात कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाने विवाह सोहळ्यात होणाऱ्या गर्दीवर निर्बंध आखून दिले असून बंद हॉल मध्ये फक्त 100 जणांना परवानगी दिली आहे.

लग्न समारंभांतील गर्दीचा हॉल मालकाला दणका; पालिकेने केला 50 हजारांचा दंड
"...तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते"; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान (पहा Video)

मात्र विरार (Virar) मध्ये सुरू असलेल्या या लग्नात शेकडोहून अधिक नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी ना सोशल डिस्टनसिंग ना मास्क चा वापर केल्याचे दिसून आल्याने पालिकेने हॉल मालकाला 50 हजारांच्या दंडाची कारवाई केली आहे. सध्या लग्न समारंभांच्या सनई सर्वत्र वाजत आहेत मात्र राज्य सरकारच्या निर्बंधांच्या नव्या नियमावलीनुसार कार्यक्रम समारंभात गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचार बंदी करण्यात आली असून कोरोनाचे (Corona) रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने शासनाने नवीन नियमावली देखील जारी केली आहे. नागपूरमध्येही आजपासून नवे कोरोना नियम सुरु केले आहेत. तर पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित विद्यार्थी आढळून आले आहेत त्यामुळे कोरोना नियमांच पालन करण अत्यंत गरजेच असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगितलं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com