मामाला लाखोंचा चुना, भाच्यानं 50 तोळे सोनं लंपास करून केली जिवाची मुंबई

पुण्यात राहुन मौज- मजा करण्याकरिता एका अल्पवयीन मुलाने मामाच्या घरामधील तब्बल ५० तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मामाला लाखोंचा चुना, भाच्यानं 50 तोळे सोनं लंपास करून केली जिवाची मुंबई
मामाला लाखोंचा चुना, भाच्यानं 50 तोळे सोनं लंपास करून केली जिवाची मुंबई Saam Tv

पुणे : पुण्यात राहुन मौज- मजा करण्याकरिता एका अल्पवयीन मुलाने मामाच्या घरामधील तब्बल ५० तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाने आपल्या काही मित्रांच्या साथीने घरामधील तब्बल ५० तोळे दागिने लंपास करण्यात आले आहे. यानंतर सोने आपसात वाटून, मुंबई आणि पुण्यात जाऊन मौजमजा केली.

मात्र, एकाच दिवशी गावातील ३ जण तरुण गायब असल्यामुळे यांच्यावर संशय बळावला होता. यानंतर अधिक तपासात भाच्याने मोठा कांड केल्याची माहिती उघडकीस आली आहे. यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली असून, त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या अल्पवयीन तरूणाचे मामा पुण्यात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहेत. या तरुणाचे मुळगाव बीड आहे. मामाला वाटले की भाच्याला गावाकडे चांगले शिक्षण मिळणार नाही.

हे देखील पहा-

याकरिता मामाने त्याला पुण्यात बोलवून आपल्या घरी शिक्षणाकरिता ठेवले होते. यादरम्यान मामाच्या घरी त्याच्या मित्रांचे येणे जाणे वाढले होते. या येण्या- जाण्याचा त्यांना कळाले की घरामध्ये खूप सोने आहे. यावरून ३ मित्रांनी हे सोने चोरून, मुंबईत आणि पुण्यात मस्त मौजमजा करायची अशी भन्नाट त्यांना कल्पना सुचली आहे. यानुसार आरोपी भाच्याने आणि आपल्या ६ मित्रांच्या मदतीने घरामधील तब्बल ५० तोळे सोन्यावर डल्ला मारला होता.

यानंतर सगळ्या आरोपीने हे सोने आपसात मध्ये वाटून घेतले आहे. तसेच 1 सप्टेंबर दिवशी भाच्यासह ३ पुणे, मुंबईला जाऊन आपले शौक पूर्ण करून आले आहेत. यादरम्यान गावामधील ३ जण एकाच दिवशी गायब झाल्याने संशय बळावला. यानंतर सगळ्या नातेवाईकांची चौकशी सुरु करण्यात आली. या चौकशीत भाच्याने लिहून, ठेवलेली एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत कोणत्या मित्राला किती सोने दिले याचा संपूर्ण तपशील त्यामध्ये लिहिला होता.

मामाला लाखोंचा चुना, भाच्यानं 50 तोळे सोनं लंपास करून केली जिवाची मुंबई
जिंतूर शहरात पुन्हा धाडसी चोरी; सव्वा आठ लाख रुपयांचा माल लंपास

यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार पुणे, मुंबईला फिरायला गेलेल्या ३ ही आरोपींना पोलिसांनी बीडमध्ये आणून ७ ही जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सुरू करण्यात आलेल्या चौकशी मध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यातील एका आरोपीने ६५ हजारांचा महागडा मोबाइल फोन खरेदी केला होता. तर दुसऱ्याने १४ तोळे सोने एका खाजगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून लोन घेतले आहे. तर एका पठ्ठ्याने १० तोळे सोने एका सराफाला अवघ्या दीड लाखात मध्ये विकले आहे. या गुन्ह्यातील सातही आरोपी अल्पवयीन असून, या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Edited By- digambar jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com