हृदयद्रावक! मामाच्या घरी गेले ते परतलेच नाहीत; २ आणि ३ वर्षीय चिमुरड्यांना टँकरने चिरडलं

दोन वर्षाची श्रुती गुप्ता ही कल्याण येथे राहणारी असून आई रंजना गुप्ता हिच्यासोबत ती मामांच्या घरी आली होती.
Chembur Accident News
Chembur Accident Newsजयश्री मोरे

मुंबई : चेंबूर पोलीस ठाण्याजवळ (Chembur Police Station) मंगळवारी सकाळी भरधाव टँकरने तिघांना धडक दिल्याने दोन वर्षांची मुलगी आणि तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात या अपघातातील मुलीची आई गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रुती गुप्ता वय वर्ष २ आणि ऋषी वय वर्ष ३ अशी दोन मयत चिमुरड्या मुलांची नावं आहेत. श्रुती गुप्ता ही कल्याण (Kalyan) येथे राहणारी असून आई रंजना गुप्ता वय वर्ष २८ हिच्यासोबत ती मामांच्या घरी आली होती. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास चेंबूर नाका (Chembur Naka) परिसरात असलेल्या एका रुग्णालयात (Hospital) आईसह ही चिमुरडी गेली होती.

हे देखील पाहा -

रुग्णालयातून हे तिघेही घरी परतत असताना, चेंबूरच्या चरई तलावाजवळ रस्ता पार करत असताना चेंबूर कॉलनीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वेगात आलेल्या या टँकरने रस्ता पार करणाऱ्या तिघांना जोरदार धडक दिली.

यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते. तत्काळ तिघांना शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच श्रुती आणि ऋषीचा मृत्यू झाला. तर यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी टँकर चालक राजेंद्र गोहिल वय वर्ष ४६ याच्यावर गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com