
मुंबई : आज सकाळपासून मुंबईत एनआयएने छापासत्र सुरु केले होतं. दिवसभरात मुंबई आणि आसपासच्या परिसरात २४ ठिकाणी छापेमारी केल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अधिकृत माहिती दिली आहे. मुंबई आणि मीरारोड परिसरात केलेल्या छापेमारीत 'एनआयए'ने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, शस्त्रसाठ्यासह संशयित कागदपत्र जप्त केली असून छापेमारी केलेल्या जवळपास सर्व ठिकाणचा पैसा रियल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
रियल इस्टेट तसेच अन्य माध्यमातून जमा झालेला पैसा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल् कायदा या सारख्या दहशतवादी संघटनांना पुरवल्या जात असल्याचा दावा देखील NIAने आपल्या प्रेस रिलीजमध्ये केला आहे. तसंच आज छापा टाकण्यात आलेली सर्व ठिकाण ही दशवतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकांची असल्याचंही NIA ने सांगितलं आहे.
दरम्यान, सकाळी ६ वाजल्या पासून माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी (Suhail Khandwani) यांच्या मालमत्तांवरही छापेमारी केली. त्यांच्या घरासह कार्यालयात सर्च ऑपरेशन सुरू होतं. सायंकाळी ७ वाजता हे सर्च ऑपरेशन थांबवून NIA अधिकारी सुहेल खंडवानीच्या कार्यालयातून बाहेर पडले. जवळपास १३ तास खंडवानी यांची एनआयएने चौकशी केली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.