'त्या' बुडालेल्या कार मालकाला मिळाली नवी गाडी भेट

गाडी सोशल मीडियावर सुपर-हिट ठरली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ही गाडी चर्चेत आली आहे.
'त्या' बुडालेल्या कार मालकाला मिळाली नवी गाडी भेट
'त्या' बुडालेल्या कार मालकाला मिळाली नवी गाडी भेटजयश्री मोरे

घाटकोरमध्ये इमारतीसमोर पार्किंगमध्ये उभी केलेली चार चाकी गाडी तिथेच बुडाल्याचा व्हिडिओ गेल्या महिन्यात प्रचंड व्हायरल झाला होता. ही गाडी सोशल मीडियावर सुपर-हिट ठरली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ही गाडी चर्चेत आली आहे. आता या कारच्या मालकाला नवीन गाडी भेट स्वरुापात देण्यात आली आहे. घाटकोपर येथील एका इमारतीतीच्या पार्किंगमध्ये खड्डा तयार होऊन त्यात चक्क चार चाकी बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या इमारतीच्या परिसरात पुर्वी एक विहीर होती.

विहिरीच्या काही भागावर आरसीसी काम करुन ती विहीर झाकण्यात आली होती. त्या आरसीसी केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी गाडी पार्क करत होते. या गाडीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर काहींनी सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर केले तर काहींना महापालिकेवर प्रचंड टीका केली होती. तसंच, गाडीच्या मालकाचं नुकसान झाल्याबद्दल अतिव दुखःही व्यक्त केलं होतं. आता मात्र, बजाज अलाएन्स कंपनीने या कार मालकाला म्हणजेच डॉ. किरण दोषींना नवी कोरी चार चाकी भेट दिली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com