लोकलखाली झोपत प्रवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद

दीड मिनिटाहून अधिक वेळ लोकल खाली झोपून एका प्रवाशाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
Train
Trainचेतन इंगळे

मुंबई : उभ्या लोकल (Local) खाली झोपून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात (Nalasopara Railway Station) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. काल रात्री ९ वाजताच्या सुमारास एक प्रवाशाने चर्चगेट लोकल मधून उतरून स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेन खाली रुळावर झोपून आत्महत्या करायचा प्रयत्न केला.

Train
मुलीचे दप्‍तरासह पलायन; पसार होण्यापूर्वीच प्रेमीयुगुल ताब्यात

जवळपास दीड मिनिटाहून अधिक वेळ हा प्रवासी रेल्वे रुळावर झोपला होता. रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी आरडा ओरड केल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी ट्रेन थांबवून त्याचे प्राण वाचविले. हिरालाल कैलास सहानी असं त्याचे नाव असून तो बोरिवली येथे राहत असल्याची माहिती माहिती मिळत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com